नवी दिल्ली : रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. उर्वरित जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही रामदास आठवले यांनी केली आहे. दिल्लीत विधानसभेची निवडणूक भाजपाच्या नेतृत्वात रालोआ लढवले. ही निवडणूक भाजपाच्या नेतृत्वातील रालोआच जिंकेल; असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
Jharkhand : माथेफिरू मुख्याध्यापकाने दिली ८० मुलींना शर्टशिवाय घरी जाण्याची शिक्षा
दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहे. या सर्व जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार दिल्लीत बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विधानसभेच्या ७० जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे.
Gujarat International Kite Festival 2025: अहमदाबादमध्ये रंगणार विविधरंगी पतंगाचा मेळा !
याआधी दिल्ली विधानसभेच्या २०२० च्या निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान झाले आणि मतमोजणी ११ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ६२ आणि भारतीय जनता पार्टीने आठ जागा जिंकल्या. बहुमताच्या जोरावर आम आदमी पार्टीने सरकार स्थापन केले. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आधी अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली होती. पण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागल्यामुळे नंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आम आदमी पार्टीच्याच आतिशी मार्लेना सिंग या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. आतिशी यांनी २१ सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
आठवले गटाचे १५ उमेदवार
- सुल्तानपूर माजरा विधानसभा मतदार संघ- लक्ष्मी
- कोंडली विधानसभा मतदार संघ- आशा कांबळे
- तिमरपूर विधानसभा मतदार संघ- दीपक चावला
- पालम विधानसभा मतदार संघ- विरेंदर तिवारी
- नवी दिल्ली विधानसभा मतदार संघ- शुभी सक्सेना (माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात)
- प्रतापगंज विधानसभा मतदार संघ- रणजीत
- लक्ष्मी नगर विधानसभा मतदार संघ- विजय पाल सिंह
- नरिला विधानसभा मतदार संघ- कन्हैया
- संगम विहार विधानसभा मतदार संघ- तजेंदर सिंह
- मालविय नगर विधानसभा मतदार संघ- राम नरेश निशाद
- तुघलकाबाद विधानसभा मतदार संघ- मंजूर अली
- सदर बाजार विधानसभा मतदार संघ- मनीषा
- बदारपूर विधानसभा मतदार संघ- हर्षित त्यागी
- चांदणी चौक विधानसभा मतदार संघ- सचिन गुप्ता
- मटिया महल विधानसभा मतदार संघ- मनोज कश्यप
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ – निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणुकीचा कार्यक्रम
- अधिसूचना : शुक्रवार १० जानेवारी २०२५
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : शुक्रवार १७ जानेवारी २०२५
- उमेदवारी अर्जांची छाननी : शनिवार १८ जानेवारी २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : सोमवार २० जानेवारी २०२५
- मतदान : बुधवार ५ फेब्रुवारी २०२५
- मतमोजणी : शनिवार ८ फेब्रुवारी २०२५
- निवडणूक प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करणार : सोमवार १० फेब्रुवारी २०२५