Saturday, February 15, 2025
HomeदेशGujarat International Kite Festival 2025: अहमदाबादमध्ये रंगणार विविधरंगी पतंगाचा मेळा !

Gujarat International Kite Festival 2025: अहमदाबादमध्ये रंगणार विविधरंगी पतंगाचा मेळा !

गुजरात : भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा सण जानेवारी महिन्यात अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच मकरसंक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये इंटरनॅशन पतंग महोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या इंटरनॅशन पतंग महोत्‍सवाचे शनिवारी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी उद्घाटन केले.

Mahakumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात येणाऱ्या नागा साधुंचा काय आहे इतिहास ?

साबरमती नदीच्या किनाऱ्यावर हा महोत्‍सव

या महोत्‍सावात ४७ देशातून १४३ स्‍पर्धक सहभागी झाले आहेत. हा महोत्‍सवा चार दिवस चालणार आहे. अहमदाबादच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर हा महोत्‍सव ११ ते १४ जानेवारीदरम्‍यान चालणार आहे. अहमदाबादबरोबर स्‍टॅच्यू ऑफ युनिटीच्या समोर एकता नगर, राजकोट, वडोदरा, सुरत, शिवराजपूर, याठिकाणीही एक – एक दिवस हा महोत्‍सव भरवला जाणार आहे. यावेळी बोलताना गुजराजचे मुख्यमंत्री पटेल म्‍हणाले की देशाच्या पंतग मार्केटमध्ये मार्केटमध्ये ६५ टक्‍के वाटा एकट्या गुजरातचा आहे. गुजरातमधून ब्रिटन, कॅनडा, अमेरिका आदी देशात पतंग निर्यात केले जातात.

महोत्‍सवात १४३ विदेशी पतंगबाज सहभागी

राजकोट महापालिका आयुक्‍त तुषार सुमेरा म्‍हणाले की आज यथे भरलेल्या पतंग महोत्‍सवात देशविदेशातून स्‍पर्धक व पर्यटक सहभागी झाले आहेत. गजरातचे पर्यटनमंत्री मुलू बेरा यांनी सांगितले की या महोत्‍सवात १४३ विदेशी पतंगबाज व देशातंर्गत ५२ पतंगबाज जे विविध ११ राज्‍यातून सहभागी होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -