मुंबई : सर्वसामान्य गावचा किंवा इतर प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजे एसटी बसला देतात. मात्र काही दिवसांपूर्वी वाढत्या महागाईमुळे एसटी बस कर्मचाऱ्यांनी बसचे भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटीच्या प्रवास दरात १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर आता एसटीमागोमाग रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महाग (Transportaion Price Hike) होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे ऐन महागाईत सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे.
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन बनला इंजिनियर; १० वर्षानंतर मिळाली डिग्री!
राज्यभरात सातत्याने वाढत चाललेली महागाई पाहता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल डिजेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाच्या दरात २ रुपये आणि टॅक्सीच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसेच शहरी बससेवेचे तिकीटसुद्धा १ ते ५ रुपयांनी महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Transportaion Price Hike)