Sa La Te Sa La Na Te Movie : 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टीजर!

चित्रपटाच्या टीजरचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन


मुंबई : पर्यावरण, पत्रकारिता, प्रेम, नातेसंबंध, राजकारण, गुन्हेगारी, पैसा, प्रशासन अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाचा धमाकेदार टीजर नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आवर्जून उपस्थित होते. विदर्भ आणि खानदेशात लोकपरंपरेत वाघ नाचविण्याची परंपरा प्रसिद्द आहे. याच पारंपरिक पद्धतीने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पाहुणे आणि कलाकारांचे स्वागत करण्यात आले. लक्षवेधी नाव असलेल्या या चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.





विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार, पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. त्याशिवाय पर्यावरणाचे प्रश्न, गुन्हेगारी, राजकारण असे मुद्देही या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं टीजरवरून दिसून येतं. आजवर अनेक चित्रपटांतून पर्यावरण, वृत्तवाहिन्या, राजकारण अशा विषयांशी संबंधित गोष्टी दाखवल्या गेल्या असल्या तरी या चित्रपटाची गोष्ट खूपच वेगळी असल्याचं टीजर पाहून जाणवतं. 'जंगलातील एकेका वाघाचा एरिया ठरलेला असतो,' या वाक्यापासून सुरुवात होणारा टीजर क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा आहे. 'स ला ते स ला ना ते' हा चित्रपट आता चित्रपटगृहात पाहण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी