अहमदाबाद : सध्या लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे समोर आले आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे एका ८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदय विकाराच्या झटक्याने (Heart Attack) शाळेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील झेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. तिसरीच्या वर्गात शिकणारी गार्गी रणपारा (८) असे मृत मुलीचे नाव असून आज सकाळी शाळेच्या वर्गात जात असताना लॉबीमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर लगेचच बेशुद्ध पडली. यावेळी तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शालेय शिक्षकांनी तिला सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) दिले आणि रुग्णवाहिका बोलावून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गार्गीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये आठ वर्षांची मुलगी शाळेच्या लॉबीमध्ये चालताना दिसत आहे. तथापि, तिच्या वर्गात जाताना तिला अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे ती लॉबीमध्ये खुर्चीवर बसते. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर खुर्चीवरून सरकताना दिसत आहे. ती कोसळली तेव्हा शिक्षक आणि इतर विद्यार्थी लॉबीमध्ये उपस्थित होते. (Heart Attack)
मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका…
मॉस्को : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे.या युद्धात…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन पानिपत : मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे…
प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (१३ जानेवारी)…
मुंबई : ‘हुप्पा हुय्या’ (Huppa Huiya) या चित्रपटाच्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट…