नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील आमदार गरप्रीत बस्सी गोगी (Gurpreet Gogi) यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कुटुंबियांनवर दु:खाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे (AAP) आमदार गुरप्रीत बस्सी गोगी बंदूक साफ कराताना त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. परंतु यावेळी बायको-मुलं घरात असताना एका खोलीत जात गोगी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार गोगी यांना डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आप आमदाराच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे.
गुरप्रीत गोगी शुक्रवारी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. त्यानंतर जेवण करून आपल्या खोलीत गेले. त्यानंतर थोड्यावेळात खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. आवाज ऐकताच त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी खोलीकडे धावल्या. खोलीत गोगी रक्ताच्या धारोळ्यात पडलेले दिसले, हे पहिल्यानंतर पत्नीच्या पायाखालची वाळूच सरकली. तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका…
मॉस्को : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे.या युद्धात…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन पानिपत : मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे…
प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (१३ जानेवारी)…
मुंबई : ‘हुप्पा हुय्या’ (Huppa Huiya) या चित्रपटाच्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट…