लॉस अँजेलिसचा वणव्यामुळे १२ हजार घरे आणि ३५ हजार एकर वन क्षेत्र जळून खाक

  85

लॉस अँजेलिस : अमेरिकेतली लॉस अँजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्यामुळे आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त घरे आणि ३५ हजार एकरांपेक्षा जास्त वन क्षेत्र खाक झाले आहे. अनेक खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वणवा वेगाने पसरत असल्यामुळे लॉस अँजेलिसमधील ब्रेंटवूड भागातील नागरिकांना सक्तीच्या स्थलांतराचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे जगातील सर्वात बलाढ्य देश म्हणून ओळखली जाणारी अमेरिका या वणव्यासमोर केविलवाणी भासू लागली आहे.



अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेलिस हे एक मोठे शहर आहे. या शहराजवळच्या जंगलात या दिवसांत वणवा सहसा भडकत नाही. पावसामुळे वातावरण दमट असते. यामुळे वणव्याचा धोका कमी असतो. पण मागील काही महिन्यांत पाऊस पडलेला नाही. वातावरण अतिशय कोरडे आहे. यामुळे वणवा झपाट्याने पसरला. वाऱ्याच्या दिशेमुळे वणवा पसरण्यास आणखी मदत झाली आहे. जंगलातून जाणाऱ्या विजेच्या तारांनाही आग लागली. यामुळेही वणवा पसरण्याचा वेग वाढला आहे.



आता वाऱ्याचा वेग मंदावला अथवा वाऱ्याने दिशा बदलली तरच वणवा नियंत्रणात आणणे शक्य होईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी लॉस अँजेलिसच्या जंगलातील वणवा हे कॅलिफोर्निया राज्यापुढील मोठे संकट असल्याचे सांगितले. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अध्यक्षांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कौतुक केले. अग्निशमन दलाच्या जवानांचे धाडस कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, ते हिरो आहेत; असे बायडेन म्हणाले.



हॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सेलिब्रेटींची घरं हे लॉस अँजेलिस शहराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पण वणव्यात लॉस अँजेलिसमधील अनेक सेलिब्रेटींची घरं खाक झाली आहेत. अनेक सेलिब्रेटींवर घर सोडून सुरक्षित ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

वणवा प्रकरणावरुन अमेरिकेत सत्ताधारी डेमोक्रॅट आणि २० जानेवारी रोजी सत्तेत येणार असलेले रिपब्लिक यांच्यात राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. डेमोक्रॅट्सनी डेल्टा स्मेल्ट माशांच्या संरक्षणासाठी कॅलिफोर्निया प्रांताला होणारा पाणी पुरवठा नियंत्रणात ठेवला आहे. ज्या भागात डेल्टा स्मेल्ट मासे आढळतात त्या भागातील जलाशयांमध्ये जास्त पाणी साठा राहावा यासाठीचे नियोजन केले आहे. यामुळे लॉस अँजेलिसजवळ वणवा भडकला त्यावेळी आग नियंत्रणात आणण्यासाठी कॅलिफोर्निया राज्याजवळ पुरेसा पाणीसाठा नव्हता. याच कारणामुळे अद्याप वणवा धुमसत आहे. परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही; असा गंभीर आरोप रिपब्लिकन नेत्यांनी केला आहे.

कॅलिफोर्निया राज्याला पुरेसे पाणी उपलब्ध झाले तर तिथले अनेर प्रश्न सुटण्यास मदत होईल, वणवा नियंत्रणात आणणे शक्य होईल; असा विश्वास रिपब्लिकन्सनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

Kelley Mack : 'द वॉकिंग डेड' फेम अभिनेत्री केली मॅकचे निधन; वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड आणि टीव्ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केली मॅक (Kelley Mack) हिचं वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी निधन झालं आहे.

टॅरिफची धमकी देऊनही भारत-रशिया मैत्री 'जैसे थे'च! चिडलेले ट्रम्प म्हणाले "२४ तासांत भारतावर..."

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भारी कर वाढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. एका

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,