Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीलॉस अँजेलिसचा वणव्यामुळे १२ हजार घरे आणि ३५ हजार एकर वन क्षेत्र...

लॉस अँजेलिसचा वणव्यामुळे १२ हजार घरे आणि ३५ हजार एकर वन क्षेत्र जळून खाक

लॉस अँजेलिस : अमेरिकेतली लॉस अँजेलिसच्या जंगलात भडकलेल्या वणव्यामुळे आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त घरे आणि ३५ हजार एकरांपेक्षा जास्त वन क्षेत्र खाक झाले आहे. अनेक खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वणवा वेगाने पसरत असल्यामुळे लॉस अँजेलिसमधील ब्रेंटवूड भागातील नागरिकांना सक्तीच्या स्थलांतराचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे जगातील सर्वात बलाढ्य देश म्हणून ओळखली जाणारी अमेरिका या वणव्यासमोर केविलवाणी भासू लागली आहे.

HMPV Virus : मुंबई, गुजरातसह आता आसाममध्येही एचएमपीव्ही व्हायरसची एन्ट्री!

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजेलिस हे एक मोठे शहर आहे. या शहराजवळच्या जंगलात या दिवसांत वणवा सहसा भडकत नाही. पावसामुळे वातावरण दमट असते. यामुळे वणव्याचा धोका कमी असतो. पण मागील काही महिन्यांत पाऊस पडलेला नाही. वातावरण अतिशय कोरडे आहे. यामुळे वणवा झपाट्याने पसरला. वाऱ्याच्या दिशेमुळे वणवा पसरण्यास आणखी मदत झाली आहे. जंगलातून जाणाऱ्या विजेच्या तारांनाही आग लागली. यामुळेही वणवा पसरण्याचा वेग वाढला आहे.

Los Angeles Wildfire : बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री अडकली लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात!

आता वाऱ्याचा वेग मंदावला अथवा वाऱ्याने दिशा बदलली तरच वणवा नियंत्रणात आणणे शक्य होईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी लॉस अँजेलिसच्या जंगलातील वणवा हे कॅलिफोर्निया राज्यापुढील मोठे संकट असल्याचे सांगितले. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अध्यक्षांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कौतुक केले. अग्निशमन दलाच्या जवानांचे धाडस कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, ते हिरो आहेत; असे बायडेन म्हणाले.

उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात

हॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सेलिब्रेटींची घरं हे लॉस अँजेलिस शहराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पण वणव्यात लॉस अँजेलिसमधील अनेक सेलिब्रेटींची घरं खाक झाली आहेत. अनेक सेलिब्रेटींवर घर सोडून सुरक्षित ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

वणवा प्रकरणावरुन अमेरिकेत सत्ताधारी डेमोक्रॅट आणि २० जानेवारी रोजी सत्तेत येणार असलेले रिपब्लिक यांच्यात राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. डेमोक्रॅट्सनी डेल्टा स्मेल्ट माशांच्या संरक्षणासाठी कॅलिफोर्निया प्रांताला होणारा पाणी पुरवठा नियंत्रणात ठेवला आहे. ज्या भागात डेल्टा स्मेल्ट मासे आढळतात त्या भागातील जलाशयांमध्ये जास्त पाणी साठा राहावा यासाठीचे नियोजन केले आहे. यामुळे लॉस अँजेलिसजवळ वणवा भडकला त्यावेळी आग नियंत्रणात आणण्यासाठी कॅलिफोर्निया राज्याजवळ पुरेसा पाणीसाठा नव्हता. याच कारणामुळे अद्याप वणवा धुमसत आहे. परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही; असा गंभीर आरोप रिपब्लिकन नेत्यांनी केला आहे.

कॅलिफोर्निया राज्याला पुरेसे पाणी उपलब्ध झाले तर तिथले अनेर प्रश्न सुटण्यास मदत होईल, वणवा नियंत्रणात आणणे शक्य होईल; असा विश्वास रिपब्लिकन्सनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -