वॉशिंग्टन डी.सी : अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटीमधील ही आगाची घटना आतापर्यंतची सर्वात भीषण आहे. लॉस एंजेलिसमधील (Los Angeles wildfires) आगीत आतापर्यंत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीदरम्यान बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हॉटेलमध्ये अडकून पडली असल्याची माहिती समोर आली आहे. तिने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Black Dog Film : ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपटाचा पडदा
काय म्हणाली नोरा?
नोरा कामाच्या निमित्ताने लॉस एंजेलिसला गेली होती. तिने इंस्ट्राग्राम स्टोरीजमधून धगधगच्या आगीचे दृश्य दाखवले आहे. नोरा म्हणते की, “मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि इथले जंगल भीषण आगीत जळत आहे. मी असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. आम्हाला पाच मिनिटांपूर्वीच हॉटेल सोडून जाण्याचा आदेश मिळाला. म्हणून मी माझे सर्व साहित्य लगेच पॅकिंग केले आणि मी आता येथून बाहेर पडत आहे. मी विमानतळाजवळ जाऊन तिथे आराम करेन. कारण आज माझी फ्लाईट आहे आणि मला आशा आहे की मला फ्लाईट वेळेत मिळेल.”
Actress Nora Fatehi shares ordeal as she finds herself trapped in Los Angeles wildfires… pic.twitter.com/PSb3jCCEIn
— Business Today (@business_today) January 10, 2025
आतापर्यंत १० जणांचा होरपळून मृत्यू
लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनर विभागाने सांगितले की, आगीशी संबंधित घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत.