Wednesday, January 22, 2025
Homeताज्या घडामोडीउत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात

उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात

बांधकाम सुरू असलेली लिंटल कोसळली; अनेक कामगार अडकले, मदतकार्य सुरू

कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली. स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेला लिंटेल अचानक कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला. अपघाताच्या वेळी २४-२५ कामगार बांधकामात व्यस्त होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने इतर गाडलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले आहे.

घटनास्थळी मदतकार्याला वेग

या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, रेल्वे अधिकाऱ्यांसह एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य गतीने सुरू केले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले जात आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत काम

अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कन्नौज स्थानकावर विकासकाम सुरू होते. मात्र, याच कामादरम्यान लिंटेल कोसळल्याने अपघात घडला. घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना तत्काळ आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

Jumped Deposit Scam: सावधान ! पिन टाकताच अकाऊंटमधून उडतील पैसे

समाजकल्याण मंत्र्यांची उपस्थिती

समाजकल्याण राज्यमंत्री असीम अरुण हे देखिल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्याचा आढावा घेत आहेत. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली आहे. प्रशासनाने या दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्थानकावर वातावरण तणावपूर्ण

दुर्घटनेमुळे स्थानकावर तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -