CIDCO : दर चार महिन्यांनी सिडको लॉटरी; प्रत्येकाच पसंतीचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

नवी मुंबई : सिडकोने (CIDCO) "माझे पसंतीचे सिडको घर" या महागृहनिर्माण योजनेतील २६००० घरांच्या किमती जाहीर केल्या. तसेच आतापर्यंत हजारो नागरिकांनी या घरांसाठी अर्ज केला आहे. त्याचप्रमाणे १० जानेवारी २०२५ पर्यंत अर्जाची मुदत वाढवण्यात आली होती. तसेच दर चार महिन्यांनी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याचे सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सिडकोच्या घरांचे दर पाहता या लॉटरीमध्ये घर घ्यायचे नसल्यास पुढील येणाऱ्या लॉटरीसाठी अर्जदार वाट बघू शकतात, असे सिडकोच्या अधिकांऱ्याने सांगितले.


सिडकोकडून पहिल्या टप्प्यातील काढण्यात आलेल्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख संपली असून, शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत सिडकोच्या ऑनलाइन अर्जांनंतर कोणत्या ठिकाणी घर घ्यायचे आहे, यासाठी निवड करता यावे अशी सुविधा पुरवण्यात आली होती. यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७५ हजार; तर अल्प उत्पन्न गटासाठी १ लाख ५० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार होती.


फेब्रुवारीअखेरमध्ये या लॉटरीची अनामत रक्कम भरण्याची तारीख संपणार असून सिडकोकडून विजेत्यांची लॉटरी जाहीर केल्यानंतर जितके विजेते आहेत तेवढ्यांची प्रतीक्षा यादी काढली जाते; पण यंदा प्रतीक्षा यादीसह आणखी एक यादी तयार करण्याचे सिडकोच्या विचाराधीन आहे.


जर सिडकोकडून काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये अर्जदार पात्र न ठरल्यास अनामत रक्कम पुन्हा मागू शकतो किंवा पुढील लॉटरीपर्यंत अर्जदार अनामत रक्कम तशीच ठेवू शकतो, असे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.



५० हजार अर्ज ठरले पात्र


सिडकोने काढलेल्या २६ हजार घरांच्या लॉटरीसाठी आतापर्यंत १ लाख २५ हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यातून ५० हजार पात्र झाले आहेत, तर उर्वरित अर्जदारांना सिडकोच्या कॉल सेंटरमधून संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता सिडकोकडून लॉटरीसाठी काढण्यात आलेले दर हे सिडको मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले असून, ते रेडीरेकनरच्या दराप्रमाणे ठरवण्यात आल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई