मुंबई : कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच विक्रोळीत बेस्ट बसने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट बस चालक गाडी चालू ठेवून लघुशंकेला गेल्यानंतर गाडी अनियंत्रित होऊन दोन पादचाऱ्यांना जागीच ठार केले.
विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात शनिवारी सकाळी बेस्ट बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात झाला. गाडी चालू ठेवून बस चालक लघुशंकेला गेला असता गाडीचे नियंत्रण सुटून गाडीने चहाच्या टपरीला धडक देऊन नंतर पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी असलेले दोन्ही इसम हे वेठबिगारीची काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान विक्रोळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.