मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईकरांच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या आणि खिशाला परवडणाऱ्या वडापावचे भाव वाढले. कधीही परवडणारा हा वडापाव महाग झाल्याने मुंबईकरांमध्ये नाराजी दिसून आली. अशातच आता पोळी भाजीचे दरही वाढले आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वत्र महागाई वाढल्याने त्याची झळ पोळी भाजीला बसली आहे. १०० ग्रॅम भाजीचा दर २५ रुपये होता त्यासाठी आता ग्राहकांना ३० रुपये द्यावे लागतील. तर वरण आमटी आणि कढीसाठी २० रुपये मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून डाळ, साखर, तेल,तुप, गॅस सर्वांचेच दर वाढले आहेत. भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. अनेक भाज्यांनी शंभरी गाठलीय.
Amravati News : सावकारगिरी करणाऱ्या अवैध महिलांवर सहकार विभागाची धाड
मुंबई हे नोकरदारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र वडापाव पाठोपाठ पोळी भाजीचे दर वाढल्याने मुंबईकर हवालदिल झाले आहे.