डॉन छोटा राजन दिल्लीच्या एम्समध्ये

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णालयात आहे. सायनसचा त्रास वाढल्यामुळे त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ पुढील उपचारांसाठी तो एम्स रुग्णालयातच असेल. रुग्णालयातील ज्या खोलीत त्याला ठेवले आहे त्या खोलीबाहेर तसेच ती खोली ज्या मजल्यावर आहे तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.



डॉन छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता. तब्येत बिघडल्यामुळे त्याला एम्समध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी परवानगी देईपर्यंत तो रुग्णालयातच असेल. नंतर त्याची रवानगी पुन्हा तिहार तुरुंगात होईल.



हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला शिक्षा झाली आहे. तो २००१ पासून तिहार तुरुंगात आहे. सध्या एम्समध्ये असलेल्या छोटा राजनच्या खोलीत फक्त उपचार करणारे डॉक्टर आणि निवडक वैद्यकीय कर्मचारी तसेच मोजके पोलीस यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश करण्यासाठी परवानगी नाही.

दाऊद इब्राहिम हा छोटा राजनचा प्रमुख शत्रू आहे. यामुळे रुग्णालयात असला तरी छोटा राजनच्या जीवाला असलेला धोका कमी झालेला नाही.

छोटा राजनचा खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे आहे. त्याला २०१५ मध्ये इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आली. एकेकाळी छोटा राजन हा दाऊदचा हस्तक होता. पण १९९२ - ९३ दरम्यान मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, नंतर दंगल उसळली. या घटनांनंतर दाऊद टोळीत हिंदू आणि मुसलमान अशी फूट पडली. या फुटीमुळेच दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.

भारतात छोटा राजन विरोधात वेगवेगळ्या ७० गुन्ह्यांची नोंद आहे. यात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, तस्करी, अमली पदार्थांची तस्करी आणि व्यापार असे अनेक गंभीर आरोप आहेत. यामुळे एखाद्या प्रकरणात जामीन मिळाला तरी दुसऱ्या कुठल्या तरी प्रकरणामुळे छोटा राजनचा तुरुंगातला मुक्काम वाढत आहे.
Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज