टाटा टियागो, टाटा टियागो ईव्ही आणि टिगोर लाँच

मुंबई : भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या तीन नवीन कार बाजारात लाँच केल्या आहेत. कंपनीने टियागो.ईव्ही आणि टिगोरसह एंट्री लेव्हल कार टाटा टियागोला अपडेट केले आहे. कंपनीने २०२५ या मॉडेलमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन डिझाइन आणि नवीन रंग पर्याय दिले आहेत. आपल्या मजबूत मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा एक भाग म्हणून टाटा मोटर्स २०२५ टियागो पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आणि २०२५ टिगोर पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये देत आहे. या दोन्ही कारमध्ये एमटी आणि एएमटी पर्याय उपलब्ध आहे.



कंपनीने टियागो, टियागो.ईव्ही आणि टिगोरसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे. २०२५ टियागोची सुरुवातीची किंमत ४.९९ लाख रुपये, टियागो.ईव्हीची किंमत ७.९९ लाख रुपये आणि टिगोरची किंमत ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून आहे. या कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केल्या जाऊ शकतात.

Comments
Add Comment

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र आता रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई:राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट)

"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक

मेटाने लॉंच केले नवे फिचर! हिंदी, पोर्तुगीज,...भाषांचा समावेश

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुकेन बर्ग यांनी त्यांच्या सोशल मिडीया खात्यावरुन मेटाच्या नव्या फिचरची ओळख

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

मुंबई : बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक खास भेट दिली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक