रस्ता सुरक्षा सप्ताहात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठेवलेल्या नेत्र तपासणीत आले उघडकीस
ठाणे : वाहन चालवताना चालकाची नजर कमजोर असल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे क्रमप्राप्त असले तरी अनेक चालक डोळ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि फोर्टिस हॉस्पिटल ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने टीएमटी बस चालकांकरीता आनंद नगर बस डेपोत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३० टक्के बस चालकांना दृष्टी कमजोर असल्याचे उघड झाले असून आठ टक्के चालकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाहन चालवताना डोळ्यांची भूमिका महत्वाची असून, वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे अत्यावश्यक असते. मात्र अनेक चालक डोळ्यांची तपासणी करण्याकडे कानाडोळा करतात. या प्रमुख कारणामुळे रस्ता सुरक्षा अभियान निमित्त चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील फोर्टिस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने टीएम lटीच्या १०१ चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
आम्ही प्रत्येक ‘वारां’चा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत – मुख्यमंत्री
डोळ्याकडे दुर्लक्ष केल्यावर अनेकदा याचा परिणाम नजरेवर होत असून, डोळ्यांच्या बाबतीत चालक वर्ग काहीसा बेफिकीर आल्याचे तपासणी शिबिरात दिसून आले आहे. आनंद नगर बसडेपोत केलेल्या नेत्र तपासणी शिबिरात ३० चालकांना दृष्टीदोष तर आठ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आहे. चालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉ. शीतल ढाये, आनंद नगर बस डेपोचे मॅनेजर दीपक साहू, परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक विजय दरगोडे, अविनाश सूर्यवंशी, मिथीलेश नालमवार आदींनी अथक परिश्रम घेतले.