मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने गेल्या वर्षी २०२४ मध्ये दिवाळीत नवीन घर घेतलं होत. आता अमृताने नुकतंच या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.अमृताने नवीन घरात केलेल्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.या व्हिडीओत अमृताने नवीन घराचं नाव काय ठेवलंय, याचाही खुलासा केला आहे.
अमृताने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं आहे कि, “नव्या वर्षाची ….नवी सुरुवात.. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला.. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं “एकम”.. “एकम” म्हणजे एक – जिथून सगळंच नव्याने सुरू होतं – उत्सुकता, समाधान, प्रेम, आणि डोळ्यात स्वप्नांचं आभाळ.” असं खास कॅप्शन दिलं आहे.अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. अमृताच्या या नवीन घराचं नाव आहे ‘एकम’ असं तिने ठेवलं आहे. अमृताचं हे नवंकोरं घर मुंबईतील एका टॉवरमध्ये असून २२ व्या मजल्यावर २ बीएचके असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे. अमृताच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओला लोकांनी पसंती दिलीय.
गेल्यावर्षी अमृतानं बॉलिवूड, ओटीटी, मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडली. अभिनेत्रीने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘लाईक अँड सबस्क्राईब’ आणि ‘धर्मरक्षक संभाजी महाराज’ या चित्रपटांमध्ये ती लक्षवेधी ठरली. टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही अमृतानं यंदा वेगळं आणि आव्हानात्मक काम केलं. आज प्रदर्शित झालेल्या संगीत मानापमान चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून अभिनेत्री झळकणार आहे. आता आगामी प्रोजेक्टविषयी देखील चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आगामी काळात अमृता अनेक हिंदी-मराठी कलाकृतींमध्ये दिसणार आहे. २०२५ वर्षाची उत्तम सुरुवात अमृताने केली आहे. तसेच वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…