मुंबई : कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात ९० तास काम केले पाहिजे. जर रविवारी येऊन काम करणार असाल तर मला आनंदच वाटेल. मी स्वतः रविवारी काम करतो. किती वेळ घरी राहणार आणि पत्नीला निरखून बघत बसणार ? असे एल अँड टी कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यन म्हणाले. सुब्रह्मण्यन यांच्या या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण संतापली. एल अँड टी सारख्या कंपनीच्या चेअरमन पदावर कार्यरत व्यक्तीकडून४ हे वक्तव्य अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याचे मत दीपिकाने व्यक्त केले. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्याविषयी दीपिकाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून दीपिकाने स्वतःच्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली आहे.
दीपिकाने पत्रकार फैझ डिसुझा यांच्या पोस्टवर व्यक्त होत इन्स्टा स्टोरी प्रसिद्ध केली आहे. एवढ्या वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तीकडून आलेले वक्तव्य अनपेक्षित, धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे असल्याचे मत दीपिकाने व्यक्त केले. हे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य कसे असेल, असा प्रश्न पडल्याचे दीपिका म्हणाली.
Buldhana Hair Fall Reason : बुलढाण्यातील लोकांचे केस गाळण्यामागे ‘हे’ आहे कारण
कंपनीतील अंतर्गत कार्यक्रमाच्या निमित्ताने एल अँड टी कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी निवडक L&T स्टाफशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात ९० तास काम केले पाहिजे. जर रविवारी येऊन काम करणार असाल तर मला आनंदच वाटेल. मी स्वतः रविवारी काम करतो; असे वक्तव्य केले. अब्जावधी रुपयांचे उत्पन्न असले तरी रविवारी मी काम करतो, असे एस. एन. सुब्रह्मण्यन म्हणाले. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना एस. एन. सुब्रह्मण्यन म्हणाले की, किती वेळ घरी राहणार आणि पत्नीला निरखून बघत बसणार ?
AI Job Application : झोपेत एआयच्या मदतीने १००० ठिकाणी नोकरीसाठी केला अर्ज; उठताच जे घडलं …
सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत दीपिकाने इन्स्टाद्वारे संताप व्यक्त केला. पण एस. एन. सुब्रह्मण्यन अद्याप त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. अमेरिकेत आठवड्याला ५० तास काम करतात. चीनमध्ये आठवड्याला ९० तास काम करतात. चिनी नागरिक अमेरिकेच्या नागरिकांच्या तुलनेत दर आठवड्याला जास्त तास काम करतात. यामुळेच चीन झपाट्याने प्रगती करू शकला आहे, असेही एल अँड टी कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यन म्हणाले.
मेंटल हेल्थ मॅटर्स #MentalHealthMatters ?
दीपिकाच्या इन्स्टा स्टोरीचा आणि एखाद्या संस्थेचा अथवा उपक्रमाचा संबंध असण्याची शक्यता सोशल मीडिया अभ्यासक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी इस्रायलने पॅलेस्टाईन विरोधात लष्करी कारवाई केली, त्यावेळी जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी पॅलेस्टिनिअन्स लाइव्हज मॅटर PALESTINIAN LIVES MATTER अशा स्वरुपाचे संदेश देणारे फोटो आणि मेसेज सोशल मीडियात पोस्ट केले होते. याआधी ब्लॅक लाइव्हज मॅटर BLACK LIVES MATTER अशा स्वरुपाचे संदेश देणारे फोटो आणि मेसेज सोशल मीडियात पोस्ट झाले होते. यावेळी दीपिकाने इन्स्टा स्टोरीत मेंटल हेल्थ मॅटर्स असा हॅशटॅग ( #MentalHealthMatters ) वापरला आहे. यामुळे दीपिकाच्या इन्स्टा स्टोरीतला संदेश हा सुब्रह्मण्यन यांना उद्देशून आहे की या निमित्ताने मानसिक आरोग्य या विषयावर एखादी प्रचार मोहीम राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.