नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णालयात आहे. सायनसचा त्रास वाढल्यामुळे त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ पुढील उपचारांसाठी तो एम्स रुग्णालयातच असेल. रुग्णालयातील ज्या खोलीत त्याला ठेवले आहे त्या खोलीबाहेर तसेच ती खोली ज्या मजल्यावर आहे तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.
Buldhana Hair Fall Reason : बुलढाण्यातील लोकांचे केस गाळण्यामागे ‘हे’ आहे कारण
डॉन छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता. तब्येत बिघडल्यामुळे त्याला एम्समध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी परवानगी देईपर्यंत तो रुग्णालयातच असेल. नंतर त्याची रवानगी पुन्हा तिहार तुरुंगात होईल.
राज्यभरातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला शिक्षा झाली आहे. तो २००१ पासून तिहार तुरुंगात आहे. सध्या एम्समध्ये असलेल्या छोटा राजनच्या खोलीत फक्त उपचार करणारे डॉक्टर आणि निवडक वैद्यकीय कर्मचारी तसेच मोजके पोलीस यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश करण्यासाठी परवानगी नाही.
दाऊद इब्राहिम हा छोटा राजनचा प्रमुख शत्रू आहे. यामुळे रुग्णालयात असला तरी छोटा राजनच्या जीवाला असलेला धोका कमी झालेला नाही.
छोटा राजनचा खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे आहे. त्याला २०१५ मध्ये इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आली. एकेकाळी छोटा राजन हा दाऊदचा हस्तक होता. पण १९९२ – ९३ दरम्यान मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, नंतर दंगल उसळली. या घटनांनंतर दाऊद टोळीत हिंदू आणि मुसलमान अशी फूट पडली. या फुटीमुळेच दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.
भारतात छोटा राजन विरोधात वेगवेगळ्या ७० गुन्ह्यांची नोंद आहे. यात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, तस्करी, अमली पदार्थांची तस्करी आणि व्यापार असे अनेक गंभीर आरोप आहेत. यामुळे एखाद्या प्रकरणात जामीन मिळाला तरी दुसऱ्या कुठल्या तरी प्रकरणामुळे छोटा राजनचा तुरुंगातला मुक्काम वाढत आहे.