दिल्ली विमानतळावर आढळली मगरीची कवटी

  47

कॅनडाहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात


नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये मगरीची कवटी आढळून आली आहे. हा प्रवासी कॅनडाहून आला असून विमानतळावर बॅगची तपासणी करताना ही कवटी आढळून आली. संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर केले नसले तरी त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅनडाहून भारतात आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाची बॅग तपासताना काहीतरी अणकुचीदार लागले. त्यामुळे त्याच्या बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या बॅगमधून मगरीच्या पिल्लाची कवटी सापडली. त्‍याच्याकडे असलेल्‍या बॅगेत एका क्रिमी रंगाच्या कपड्यामध्ये मगरीच्या पिलाची कवटी गुंडाळली होती. ही कवटी सुमारे ७७७ ग्रॅम वजनाची आहे अशी माहिती कस्‍टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भातील निवेदनात कस्टम अधिकारी म्हणाले की, भारतात संरक्षित असणाऱ्या मगरीची ही कवटी आहे.


भारतीय वन्यजीव कायद्याचा भंग केल्‍याचा व कस्‍टम कायद्याचा भंग केल्‍याचा ठपका संबधित युवकावर ठेवला आहे. संरक्षित असलेल्‍या प्राण्याच्या अवयवांची तस्‍करी करणे हा गुन्हा गंभीर स्‍वरुपाचा असून आता याबाबात कस्‍टम ऑफिस व वन्यजीव कार्यालय या दोन्हीच्या संयुक्‍तरितीने कारवाई केली जाणार आहे. ही मगरीची कवटी आता वन्यजीव कार्यालयाकडे हस्‍तांतरीत करण्यात आली असून. याची आता तपासणी केली जाणार आहे. भारतामध्ये २०११ ते २०२० या कालावधीत विमानतळावरुन वन्यजीवांच्या अवयवांची तस्‍करीच्या १४१ घटना उघडकीस आल्‍या आहेत. यामध्ये जवळपास १४६ प्रकारच्या वन्यजीवांची तस्‍करी करण्याचा प्रयत्‍न झाला होता. कासव, साप, पाली आदींचा यामध्ये समावेश आहे.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस