रत्नागिरी : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समुद्रात परप्रांतीय बोटींच्या हालचालींवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर ‘वॉच’ राहावा, यासाठी काल ( दि. ९ ) ड्रोन प्रणालीचे उद्घाटन केले. अशातच रत्नागिरी समुद्रात बुधवारी ( दि. ८ ) रोजी रात्री उशिरा एका गस्तीनौकेवरील अधिकाऱ्यांवर परप्रांतीयांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे.
रात्री अकराच्या सुमारास समुद्रात अवैध बोटी असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्तीनौका गोळप-पावस या दिशेने गेली होती. यावेळी हा प्रकार घडला. अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींना पकडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर बोटिंवरील खलाशांनी घेरले व हल्ला करण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली.
Fake Body Spray Blast : बनावट ‘बॉडी स्प्रे’चा स्फोट होऊन चार जण जखमी
यावेळी बोटीतील अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला व सूत्र हलली. या सगळ्या गंभीर घटनेची तात्काळ दाखल घेत त्यांनी स्थानिक मच्छीमार व पोलीस कुमक पाठवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हा सगळा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उशिरा रत्नागिरी जवळ समुद्रात घडला आहे. संबंधित परप्रांतीय नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढची कार्यवाही सुरू आहे.