नालासोपारा : ‘बॉडी स्प्रे’चा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. ‘बॉडी स्प्रे’ वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील तब्बल ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
नालासोपारातील आचोळा येथील संकेश्वर नगर मधील रोशनी अपार्टमेंटच्या रूम नंबर ११२ येथे बॉडी स्प्रे बॉटल वरील संपलेल्या तारखा बदलण्याचे काम सुरू होते, त्याचवेळी घरात स्फोट झाला. हा कारखाना कोणत्याही कंपनीचा नसून बनावट सुगंधी द्रव्य ( बॉडी स्प्रे ) बनवणारा कारखाना होता. या स्फोटात पती पत्नीसह त्यांची दोन मुले गंभीर जखमी असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.