मालवण : शिवसेना पक्ष वाढीसाठी आता गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना, बूथ सक्षम केले जाणार आहेत. येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुका शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असून शिवसेनेचा झंझावात सर्वांना बघायला मिळेल, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर आदी उपस्थित होते.
आमदार निलेश राणे म्हणाले, राज्यात महायुतीची सत्ता आहे. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे पक्षाला मोठे बळ आले. येत्या काळात अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होणार आहेत. पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून गाव तिथे शिवसेना शाखा हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. यात गावातील संघटना वाढीबरोबरच बूथ सक्षम करून मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या काळात होऊ घातलेल्या या सर्व निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत.
शिवसेना पक्षाचे काम पाहून आमच्या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेकजण पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्वांना घेऊन आम्ही एकत्र काम करणार आहोत. अनेकांना पक्षात सहभागी होत काम करायचे आहे अशी तळागाळातल्या प्रत्येकाची भावना तयार झाली. उपमुख्यमंत्री पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांना जे अभिप्रेत आहे तसा पक्ष आम्ही या जिल्ह्यात वाढविण्याचे काम करण्याबरोबरच सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढवून त्यात यश मिळवू असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.
मालवण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर येऊन मासळीची लूट करत होते. मात्र आक्रमक भूमिका आम्हाला घ्यावी लागली. चार हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने पकडले. मोठा दंड झाला. येथील आमदार बदलले हे समजल्यावर कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलर मालक घाबरले. ही भीती असावी लागते. आम्ही जनतेसाठी काम करतो. मोठे विशेष काही करत नाही. जनतेला अपेक्षित असे काम सुरूच राहील असे आमदार निलेश राणे म्हणाले.
सी वर्ल्ड प्रकल्पबाबत पत्रकारांनी विचारले असता आमदार निलेश राणे म्हणाले, काही गैरसमज निर्माण केले गेले. मात्र सध्यस्थितीत जनतेला काय अपेक्षित आहे? जनतेची मते विचारात घेऊन सी वर्ल्ड प्रकल्पची पुढील दिशा ठरेल, असे आ. निलेश राणे म्हणाले.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…