Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीमहिला वकिलाची ७५ लाखांना फसवणूक, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

महिला वकिलाची ७५ लाखांना फसवणूक, ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : आजकाल फसवणुकीच्या घटना वाढल्या असून जळगावात एका महिला वकिलालाच फसवल्याची घटना घडलीय. गजानन कॉलनीत राहणाऱ्या वृध्‍द महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीसाठी रक्कम दिल्यास प्रत्येक महिन्याला दीड टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंट येथे शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (६५) या वृद्ध महिला आपल्या परिवारास वास्तव्याला असून जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करून त्या आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या ओळखीतले मनीष सतीश जैन याने वृध्द महिलेला कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीचे रियल इस्टेट व बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे व्यवहारासाठी रकमेची आवश्यकता असल्याने, तुम्ही पैसे दिल्यास दीड टक्के प्रती महिन्याच्या व्याजाचा आकर्षक परतावा देईल, असे सांगून त्याने वृद्ध महिलेकडून डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२४ पर्यंत या कालावधीत एकुण ७५ लाख रुपये घेतले. या कटकारस्थानमध्ये मनीष जैन, त्याचा भाऊ अतुल सतिष जैन, त्याची आई यशोदा सतिष जैन तिघे रा.यश प्लाझा, जळगाव, जाफरखान मजीद खान रा.सुप्रीम कॉलनी, विजय इंदरचंद ललवानी रा. सिंधी कॉलनी, अक्षय अग्रवाल रा. गोलाणी मार्केट आणि कंपनीचे सेक्रेटरी असे नाव सांगणाऱ्या केतन किशोर काबरा रा. जयनगर याचा सहभाग आहे.

दरम्यान शिरीन अमरेलीवाला यांना ऑगस्ट २०२४मध्ये पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी मनीष जैन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी मनीषने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तसेच त्याच्या घरातील अतुल सतीश जैन त्याची आई यशोदा सतीश जैन यांनी धमकावत पैसे मिळणार नाही, तुमच्याकडून काय करायचं आहे करून घ्या असे सांगून धमकावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंत सिरीन अमरेलीवाला यांनी मंगळवारी ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूक करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक हे करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -