व्हिसा अभावी पाकिस्तान खो खो विश्वचषकातून बाहेर

  82

नवी दिल्ली : खो खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा शुभारंभ भारत - पाकिस्तान संघाच्या सामन्याने होणार होती. पण भारताचा व्हिसा पाकिस्तानला मिळालेला नाही. यामुळे पाकिस्तानच्या पुरुष आणि महिला संघाची खो खो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.



विश्वचषकासाठी विशिष्ट मुदतीत योग्य कादगपत्रांसह व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक असते. पण या नियमाचे पाकिस्तानकडून पालन झाले नसल्याची शक्यता आयोजकांकडून व्यक्त होत आहे. पाकिस्तान खेळणार नसल्याचे लक्षात येताच आयोजकांनी गटांची नव्याने रचना केली आहे. आता भारत - नेपाळ या सामन्याने खो खो विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे. याआधी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यंदाच्या खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष गटात २० आणि महिला गटात १९ संघ आहेत.



खो खो विश्वचषक २०२५ - स्पर्धेसाठी संघांची गटवारी

पुरुष
अ गट - भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट - दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
क गट - बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट - इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

महिला
अ गट - भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
क गट - नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट - दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा कधी आणि कुठे होणार ?

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट