Document registration : आता घरबसल्या कोणालाही दस्त नोंदणी करता येणार

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार


पुढील १०० दिवसांमध्ये महसूल विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा


मुंबई : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी (Document registration) करता येण्यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई - मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात ३० कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामीत्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोन द्वारे जीआयएस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत.


जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी सुलभ वाळू धोरण आणण्यात येईल. लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. रेडीरेकनरचे दर पीडीएफ स्वरुपात राहते मात्र हे दर आता गावनिहाय, प्लॉटनिहाय मिळविता येणार आहे. वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अधिमूल्य व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. महसूल विभागातील चार कॅडरची संपूर्ण माहिती पोर्टलवर आणण्यात येणार असून महसूल अधिकाऱ्यांसाठी मॅन्युअल तयार करण्यात येणार आहे. केंद्राच्या ‘अभिनव पहल’ या पोर्टलमध्ये राज्यातील अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रॅक्टिस टाकण्यात येत आहे. नवीन जिल्हा करताना प्रशासकीय यंत्रणा यापूर्वीच तयार करावी. संपूर्ण यंत्रणेला अतिरिक्त स्वरूपात तयार करून ठेवावे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

सागरी विकासाची नवी दिशा! ‘इंडिया मेरीटाईम वीक’मुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता