मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जाची अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना बुधवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मंत्री सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, मंत्री उदय सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री श्री. सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय मंत्री शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही तेवढीच मदत दिली जाईल, असे मंत्री सामंत म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या