Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार केंद्र सरकारकडून 'ही' ट्रीटमेंट’!

परिवहन मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा!


नवी दिल्ली  : केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्रातील महिला, दिव्यांग व्यक्ती, बालकल्याणसह तरुण पिढीसाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. तर आता रस्ते अपघातातील पीडितांसाठीही केंद्र सरकारने नवी योजना जाहीर केली आहे. याद्वारे रस्ते अपघातात (Road Accident) जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत.



केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ (Cashless Treatment Yojana) योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचाराकरिता दीड लाख रुपये दिले जाणार आहेत किंवा जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यासंदर्भात माहिती दिली. दिल्लीतील भारत मंडपममध्ये सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. तसेच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये सहकार्य वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.


यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना सुरु केली आहे. त्यानुसार महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांना उपाचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे किंवा त्यांच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांच्या आत पोलिसांना अपघाताची माहिती देणे आवश्यक आहे. इतकेच नाही, हिट-अँड-रन प्रकरणांतील मृतांसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.



स्कूल बस चालकांसाठी नवे नियम


शाळा आणि महाविद्यालयासमोर वाहतूक नियोजन नसल्याने दरवर्षी जवळपास १० हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू होते, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कूल बस चालकांसाठीही आम्ही नवे नियम केले आहेत, एकंदरितच प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड