MahaKumbh Mela : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान ? कधी असेल सामान्य स्नान ?

प्रयागराज : उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे महाकुंभ मेळा २०२५ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सोमवार १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ मेळा होणार आहे. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात स्नानाचे योग सहा वेळा आहेत. प्रयागराजच्या महाकुंभ मेळा २०२५ मध्ये तीन वेळा शाही स्नान आणि तीन वेळा सामान्य स्नान होणार आहे. पंचांगांच्या आधारे शाही स्नान आणि सामान्य स्नानाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.



महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज येथे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. साधुसंतांच्या मिरवणुका तसेच वेगवेगळ्या आखाड्यांचे साधुसंत आणि त्यांच्या अनोख्या परंपरा बघण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. नागा साधुंना बघण्याची संधीही नागरिकांना लाभणार आहे.



महाकुंभ मेळा २०२५ - शाही स्नानाच्या तारखा

मंगळवार १४ जानेवारी २०२५ - मकरसंक्रांत
बुधवार २९ जानेवारी २०२५ - मौनी अमावस्या
सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ - बसंत पंचमी (वसंत पंचमी)



महाकुंभ मेळा २०२५ - सामान्य स्नानाच्या तारखा

सोमवार १३ जानेवारी २०२५ - पौष पौर्णिमा
बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ - माघ पौर्णिमा
बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ - महाशिवरात्र

भारतातील चार महत्त्वाची तीर्थक्षेत्र

भारतात चार महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेश येथे उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या पात्रात कुंभमेळा होतो. उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे संगमावर तसेच हरिद्वार येथे गंगा नदीच्या पात्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पात्रात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रत्येकवेळी ४५ दिवसांसाठी कुंभमेळ्याचे आयोजन करतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने धार्मिक प्रदर्शनांचे तसेच धार्मिक चर्चासत्रांचे आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. वेद, चरक संहिता, पुराण आणि ज्योतिषशास्त्र या विषयांशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यंदा प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या ठिकाणी किमान एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनच्या मदतीने २४ तास लक्ष ठेवले जाईल. बंदोबस्तासाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बल आणि पोलीस यांची नियुक्ती केली जाईल. हर्षवर्धन तिराहा (तीन मार्ग जिथे एकत्र येतात ते ठिकाण), काली मार्ग, जीटी जवाहर आणि बांगड चौराहा (चौक किंवा चार मार्ग जिथे एकत्र येतात ते ठिकाण)
Comments
Add Comment

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला