Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश

अलिबाग :  येथील समुद्रात आक्षी साखर भागात 'हिरकन्या' ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी बचावले असले तरी बोट बुडाल्याने तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा बोट मालक जगदीश बामजी यांनी केला आहे. दुसऱ्या मच्छीमारी बाेटीतील खलाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून मदत केल्याने १५ खलाशांचा जीव वाचला आहे.




जगदीश बामजी यांच्‍या मालकीची हिरकन्या बोट १५ खलाशांसह मासेमारीसाठी निघाली होती. हिरकन्या'मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटली. त्यानंतर काही काळाने बोटीत पाणी भरू लागले. कुलाबा किल्‍ल्‍याच्‍या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली. ही घटना समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरडा करून हिरकन्यामधील खलाशांना जागे केले. त्यानंतर त्यांना बोटीत घेतले. मात्र, हिरकन्या बोट बुडाली.

मिळालेल्या माहितीनुसार हिरकन्या बोट बुडाल्याचे कळताच बोट मालक जगदीश बामजी दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचले. मत्‍स्‍यव्‍यवसाय विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी अलिबाग किनारी पोहोचले असून ते बोटीला झालेल्‍या अपघाताची माहिती घेत आहेत. अथक परिश्रमानंतर स्‍थानिकांच्‍या मदतीने अपघातग्रस्‍त बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.

Comments
Add Comment

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक

महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड - मुख्यमंत्री

नागपूर : महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य

बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून