Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

ISROच्या नव्या प्रमुखांची घोषणा, १४ जानेवारीला व्ही. नारायणन हाती घेणार पदभार

ISROच्या नव्या प्रमुखांची घोषणा, १४ जानेवारीला व्ही. नारायणन हाती घेणार पदभार

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(ISRO) नव्या प्रमुखांची घोषणा केली आहे. डॉ. व्ही. नारायणन आता इस्त्रोचे नवे प्रमुख असतील. ते १४ जानेवारीला कार्यभार हाती घेतील. मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली.


इस्त्रोचे प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. व्ही नारायणन सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे डायरेक्टर आहेत. साधारण ४ दशकातील आपल्या करिअरमध्ये त्यांनी इस्त्रोच्या अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे. डॉ नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.


डॉ. नारायणन यांचे मोठे यश GSLV Mk III व्हीकल च्या C25 क्रायोजेनिक प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करायचे आहे. त्यांच्या नेतृ्त्वात टीमने GSLV Mk IIIचा महत्त्वपूर्ण कंपोनेंट C25 स्टेज यशस्वीपणे विकसित केले.



अनेक मिशनमध्ये महत्त्वाचे योगदान


डॉ. नारायणन यांच्या मार्गदर्शनात LPSC ने इस्त्रोच्या विविध मिशनसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम आणि कंट्रोल पॉवर प्लांट डिलीव्हर केले. त्यांनी पीएसएलव्हीच्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या निर्मितीची देखरेख आणि PSLV C57साठी कंट्रोल पावर प्लांटही तयार केले. त्यांनी आदित्य स्पेसक्राफ्ट, GSLV Mk-III मिशन, चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ साठी प्रोपल्शन सिस्टीममध्येही योगदान दिले.



अनेक पुरस्कारांनी सन्मानित


इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नारायणन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात आयआयटी खडकपूर येथून रौप्य पदक, अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सुवर्णपदक आणि एनडीआरएफ येथून राष्ट्रीय डिझाईन पुरस्कारांचा समावेश आहे.

Comments
Add Comment