मुंबई : बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने नवस केला आहे. आमिर खान नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा देखील रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. या आधीही जुनैदने महाराजा हा चित्रपट केला पण तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. आता जुनैद खानचा ‘लव्हयापा’ हा नवा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. दरम्यान अभिनेता आमिर खानने सुद्धा लेकाचे भरभरून कौतुक केले आहे.
‘लव्हयापा’ या चित्रपटात जुनैद खानसह श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरसुद्धा दिसणार आहे. त्याचबरोबर ग्रुषा कपूर, आशुतोष राणा, तन्विका परळीकर आणि कॉमेडियन किकू शारदा यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा अद्वैत चंदन यांने दिग्दर्शित केला आहे, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाचे दिग्दर्शनही त्यानेच केले होते.
Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश
आमिर खानचा नवस काय आहे ??
लेकाचा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अमीर खानने ‘पण’ केला आहे. जुनैदचा हा चित्रपट ब्लॉकब्लास्टर सुपर हिट झाला तर आमिर खान धूम्रपान सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने तसा नवसच केला आहे असे म्हटले जाते.