
अनधिकृत मासेमारीवर निर्बंध आणि सागरी सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारचे आणखी एक पाऊल
मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र राज्याला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या एवढ्या मोठ्या समुद्रकिनाऱ्याची गस्त घालणे आणि अनधिकृत तसेच परकीय मासेमारीला प्रतिबंध करणे वाटते तितके सोपे नाही. याबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे अखेरीस राज्य सरकारने अनधिकृत मासेमारीला पायबंध घालण्याकरिता राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील नऊ समुद्र किनाऱ्यांवरून गुरुवारी (दि. ९ डिसेंबर) एकाच वेळी नऊ ड्रोन उडवले जाणार असून त्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(ISRO) नव्या प्रमुखांची घोषणा केली आहे. डॉ. व्ही. नारायणन आता इस्त्रोचे नवे प्रमुख असतील. ते १४ जानेवारीला ...
अनधिकृत मासेमारी आणि सागरी सुरक्षा या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. परराज्यातील अनधिकृत मच्छीमार नौकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून याचा फटका राज्यातील गरीब मच्छीमारांना होत आहे तसेच समुद्र किनाऱ्यावरून अतिरेकी कारवायांची घडामोड झाल्याची याआधीची उदाहरणे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात गंभीरता दाखवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी आधुनिक प्रणालींचा वापर करून बंदरे आणखीन सुरक्षित करण्याचे योजले आहे. त्यानुसार ड्रोनचा वापर करून समुद्र किनाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
९ डिसेंबरला १० वाजता सात जिल्ह्यातील ९ समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख प्रणालीचे प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी मत्स्य आयुक्त कार्यालय येथे कंट्रोल रूम उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन ९ तारखेला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे तसेच प्रात्यक्षिकाच्या दिवशी स्वतः मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहून या नवीन प्रणालीचे प्रात्यक्षिक पाहणार आहेत.
सात सागरी जिल्ह्यांमधून उडणार ड्रोन
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राज्यातील सात सागरी जिल्ह्यामधून नऊ समुद्रकिनाऱ्यावरून नऊ ड्रोन उडणार आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील शिरगाव, ठाणे जिल्ह्यातील उत्तन, मुंबई उपनगर जिल्ह्यातील गोराई, मुंबई शहर जिल्ह्यामधील ससून गोदी, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, साखरी नाटे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या नऊ समुद्रकिनाऱ्यावरून नऊ ड्रोन उडवले जाणार आहेत.