Monday, May 12, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक

Nashik News : नाशिकमध्ये चाललंय तरी काय? लग्नघरी शोककळा, आई-वडिलांनी का केली आत्महत्या?

Nashik News : नाशिकमध्ये चाललंय तरी काय? लग्नघरी शोककळा, आई-वडिलांनी का केली आत्महत्या?

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत एका महिलेने आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ आता नाशिकमध्ये आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


टिळकवाडी परिसरातील शाह कुटुंबात धाकट्या मुलाच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू असताना, आई-वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरलं असून, शाह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


शाह कुटुंबातील धाकट्या मुलाचा विवाह अवघ्या २० दिवसांवर आला होता. त्यामुळे घरात लगीनघाई सुरू होती. काल रात्री शाह दाम्पत्याने मुलासोबत जेवण केले. त्यानंतर पती-पत्नीने विष प्राशन केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. आई-वडिलांच्या अशा टोकाच्या पावलामुळे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.


दरम्यान, याच आठवड्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कविता अहीवळे असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेनेही नाशिकमध्ये खळबळ उडवली होती.


या घटनांमुळे नाशिकमध्ये आत्महत्या आणि त्यामागील कारणांबद्दल गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment