नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनी येत्या काळात भारतामध्येतब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबाबत घोषणा केली आहे. सोमवारी नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मिडीयावर पंतप्रधानांची भेट आणि कंपनीकडून होणाऱ्या गुंतवणुकी संदर्भात माहिती दिली आहे. सत्या नडेला यांनी पंतप्रधान मोदींचे त्यांच्या नेतृत्वाबद्दल आभार मानले आणि म्हणाले, “भारताला एआय -प्रथम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बांधण्यासाठी आणि या एआय प्लॅटफॉर्म शिफ्टचा प्रत्येक भारतीयाला लाभ मिळावा यासाठी देशात आमच्या निरंतर विस्तारावर एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.”
बजेटपूर्वीच मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाल्याने बाजारात आनंदाची उसळी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांच्या भेटीनंतर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सत्या नडेला, तुम्हाला भेटून खरोखर आनंद झाला! मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊन आनंद झाला. आमच्या बैठकीत टेक, इनोव्हेशन आणि एआयच्या विविध पैलूंवर चर्चा करणे देखील छान होते.” असे नडेला यांनी नमूद केलेय.
Mahakumbh 2025 : गायीला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी महाकुंभमेळ्यात होणार ‘महायज्ञ’
“एआयच्या क्षेत्रात भारत वेगाने अग्रस्थानाच्या दिशेनं प्रगती करत आहे. देशभरात यातून नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आम्ही एआयशी निगडित पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासासाठी जाहीर करत असलेली गुंतवणूक ही भारताला एआय क्षेत्रात अग्रस्थानि नेण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. या गुंतवणुकीचा देशभरातल्या व्यक्तींना आणि संस्थांना व्यापक प्रमाणावर फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया यावेळी सत्या नडेला यांनी दिली.