

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला. दिल्लीत ...
निलगिरी फ्रिगेट आणि सुरत विनाशिका यांच्यावरुन चेतक, ध्रुव (आधुनिक हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर), सी किंग, एमएच - ६० आर - सी हॉक ही हेलिकॉप्टर दिवस - रात्र कोणत्याही वेळी उतरू शकतील अथवा उड्डाण करू शकतील. यामुळे या दोन्ही नौकांच्या मदतीने रात्रंदिवस काम करणे शक्य आहे. दोन्ही नौकांवर नौसैनिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची आधुनिक आणि आरामदायी अशी व्यवस्था आहे. महिला नौसैनिकांसाठी या नौकांवर विशेष व्यवस्था आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या शिवालिक श्रेणीच्या निलगिरी फ्रिगेट आणि कोलकाता श्रेणीच्या सुरत विनाशिका या रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या नौकांची रचना खोल समुद्रातही वेगाने हालचाल करण्यासाठीच केली आहे.

Satya Nadella : मायक्रोसॉफ्ट भारतात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनी येत्या काळात भारतामध्येतब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ...
कलवरी श्रेणीची वाघशीर ही पाणबुडीही स्टेल्थ तंत्रज्ञानाने तयार केली आहे. यामुळे ही पाणबुडी रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या पाणबुडीची संहारक क्षमता मोठी आहे. टॉर्पेडो (पाणतीर), क्षेपणास्त्र, प्रगत सोनार प्रणाली यांच्या मदतीने समुद्रातून समुद्रावर, समुद्रातून जमिनीवर किंवा आकाशात, पाणबुडी विरोधी युद्धात प्रभावी कामगिरी करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे.

Mahakumbh 2025 : गायीला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी महाकुंभमेळ्यात होणार 'महायज्ञ'
प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून महायज्ञ होणार ...
नौदलात दाखल होत असलेली सुरत विनाशिका ही कोलकाता श्रेणीची चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. तसेच वाघशीर पाणबुडी ही कलवरी श्रेणीची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. माझगाव गोदीने निलगिरी फ्रिगेट, सुरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी यांची निर्मिती करून आत्मनिर्भर भारत या भारत सरकारच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.