Kumbhmela 2025 : कुंभमेळ्यावर HMPV व्हायरसचं सावट! चीनमधून येणाऱ्या लोकांना थांबवा...

लखनऊ : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. त्यानंतर चीनने पुन्हा एका नव्या व्हायरस उकळून काढला आहे. कोविड-१९नंतर आता एचएमपीव्ही व्हायरस देशभरात पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हारसची लागण वेगाने होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. अशातच आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या साधू-संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.



देशविदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात. याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. जाणून घ्या या पत्रात काय लिहले.


'चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. १२ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु होणार आहे. देशात चीनी HMPV चे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय. कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी. अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागेल', असे पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.