Sunday, May 11, 2025

देशब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला. दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहे. या सर्व जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार दिल्लीत बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विधानसभेच्या ७० जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे.



याआधी दिल्ली विधानसभेच्या २०२० च्या निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान झाले आणि मतमोजणी ११ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ६२ आणि भारतीय जनता पार्टीने आठ जागा जिंकल्या. बहुमताच्या जोरावर आम आदमी पार्टीने सरकार स्थापन केले. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आधी अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली होती. पण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागल्यामुळे नंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यानंतर आम आदमी पार्टीच्याच आतिशी मार्लेना सिंग या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. आतिशी यांनी २१ सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.



दिल्लीत विकासकामं, भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेली पण पूर्ण न केलेली आश्वासने हे निवडणुकीतले प्रमुख मुद्दे आहेत. यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र आहे.



दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ - निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणुकीचा कार्यक्रम
अधिसूचना : शुक्रवार १० जानेवारी २०२५
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : शुक्रवार १७ जानेवारी २०२५
उमेदवारी अर्जांची छाननी : शनिवार १८ जानेवारी २०२५
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : सोमवार २० जानेवारी २०२५
मतदान : बुधवार ५ फेब्रुवारी २०२५
मतमोजणी : शनिवार ८ फेब्रुवारी २०२५
निवडणूक प्रक्रिया 'या' तारखेपर्यंत पूर्ण करणार : सोमवार १० फेब्रुवारी २०२५
Comments
Add Comment