Mahakumbh 2025 : गायीला राष्ट्रमातेच्या दर्जासाठी महाकुंभमेळ्यात होणार 'महायज्ञ'

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा म्हणून महायज्ञ होणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याकडून या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.



प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी कालावधीत महाकुंभमेळा होणार आहे. यादरम्यान गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिबिरात आयोजित करण्यात आलेल्या या मंडपात ३२४ 'कुंडे' आणि ९ 'शिखर' आहेत. हा यज्ञ दररोज ९ तास याप्रमाणे महिनाभर चालणार आहे. या महायज्ञात ११०० पुरोहित सहभागी होणार आहेत. महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी येत असतो. जानेवारी २०२५ मध्ये कुंभमेळा आला आहे. त्यापूर्वी २०१३ मध्ये कुंभमेळा पार पडला होता. प्रयागराज शहरात महाकुंभमेळा २०२५ ची तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा