मुंबई : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला.
सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य
मुंबई : महाराष्ट्रातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.
HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; लवकरच सरकार जाहीर करणार प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक तत्वे
मुंबई : कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जग एचएमपीव्ही व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील व्हायरसमुळे (HMPV virus) ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला. दिल्लीत ...
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
Salman Khan : सलमानच्या सुरक्षेत वाढ! घराला बुलेटप्रूफ काच तर भिंतीवर काटेरी तार
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात (Baba Siddique Murder Case) मोठा खुलासा झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) सलमान खानला (Salman Khan) ...
नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी घेता किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या हे तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, असेही त्यांनी सांगितले.
MNS : मनसेत होणार मोठे फेरबदल!
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसेची तयारी
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे - MNS) ...
राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. (इज ऑफ वर्किंग) यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Asaram Bapu : बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : एका महिला अनुयायीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या ...
जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत; याकरिताचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
.....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
- विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा
- ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा
- शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा
- नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
- उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
- शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात
- शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या