Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीAsaram Bapu : बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च...

Asaram Bapu : बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : एका महिला अनुयायीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, या कालावधीत त्यांना अनुयायांशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

आसाराम बापू हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असून यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. अंतरिम जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mumbai-Goa highway : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटली

याआधी, १८ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १८ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. १ जानेवारीला कारागृहात परतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जामीन देण्यात आला आहे. याआधीही, २०२३ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता.

फेब्रुवारी २०२३ मध्ये गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याआधी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूर आश्रमात १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये त्यांच्या विरोधात दोन बलात्काराच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

एकेकाळी लोकप्रिय धर्मगुरू म्हणून ओळख असलेल्या आसाराम बापूंनी १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर पहिला आश्रम उभारला होता. त्यानंतर त्यांनी देशभरात मोठे आध्यात्मिक साम्राज्य उभे केले. त्यांचे अनुयायी लाखोंच्या घरात होते आणि त्यांचे उत्पादन तसेच साहित्याला प्रचंड मागणी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -