भारतातील 'या' राज्यांमध्ये आढळले HMPV चे तीन रुग्ण

नवी दिल्ली : भारतात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus – HMPV) बाधीत तीन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण कर्नाटकमधील बंगळुरू येथे बाप्टिस्ट रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण गुजरातमधील अहमदाबादच्या ऑरेंज रुग्णालयात उपचार घेत आहे. बाप्टिस्ट रुग्णालयात तीन महिन्यांची चिमुरडी आणि आठ महिन्यांचा चिमुरडा उपचार घेत आहेत तर ऑरेंज रुग्णालयात दोन महिन्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. खासगी लॅबच्या अहवालांआधारे तिन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप सरकारी लॅबने या प्रकरणांमध्ये अहवाल दिलेला नाही. देशात तीन मेटान्यूमोव्हायरसबाधीत रुग्ण आढळताच सर्व राज्यांची सरकारी यंत्रणा जागी झाली आहे.



महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी ह्युमन मेटान्यूमोव्हायरस संदर्भात खबरदारीचे उपाय करण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रात अद्याप ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत एकही रुग्ण आढळलेला नाही. पण खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लवकरच उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनेही खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सध्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात थेट प्रवेश देऊ नये. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करावी, अशीही मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात लवकरच केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची कमी – जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी – खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते. पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने नागरिकांना केले आहे.

हे करा

खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडासमोर हातरुमाल, टिश्यू पेपर धरा
बाहेरून आल्यावर तसेच खोकल्यावर, शिंकल्यावर, लिक्विड सोप किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर अथवा साबण आणि पाणी यांचा वापर करून हात स्वच्छ धुवा
ताप, सर्दी, खोकला, शिंका अशा स्वरुपाचा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करा आणि गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कने नाक – तोंड झाकून घ्या.
पुरेसे पाणी प्या. सकस आहार घ्या.
वास्तव्याच्या आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या.

हे करू नका

हस्तांदोलन
हातरुमाल, टिश्यू पेपर यांचा पुनर्वापर
रुग्णाशी जवळचा संपर्क
डोळे, नाक, तोंड यांना वारंवार स्पर्श करणे
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार करणे
Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या