Ravi Jadhav : रवी जाधव यांनी खरेदी केलं नवीन घर

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी नववर्षाबरोबरच त्यांच्या आयुष्याचीही नव्याने सुरुवात केली आहे. रवी जाधव यांनी एक नवीन घर खरेदी केलं आहे. नव्या वर्षात रवी जाधव यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या नव्या घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.



रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत त्यांच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळत आहे. "डोंबिवली बाहेरील दावडी गावातील छोट्याशा घरातून सूरू झालेला आमचा दोघांच्या स्वप्नांचा प्रवास आता इथवर येऊन पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायला सज्ज झाला आहे. आमच्या नव्या घराच्या वास्तूशांतीचे हे काही खास क्षण. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या ही विनंती", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





दरम्यान, दिग्दर्शक रवी जाधव यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रवी जाधव यांचे ‘बालगंधर्व’, ‘टाईमपास’, ‘बालक पालक’, ‘बेन्जो’, ‘कच्चा लिंबू’, ‘नटरंग’ असे अनेक चित्रपट हे गाजले आहेत.रवी जावध यांचा मे अटल हू या सिनेमाला प्रेक्षक आणि समिक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. त्यापूर्वी त्यांची ट्रान्सजेंडरवर आधारित ताली ही सिरीज फार गाजली. ज्यात सुष्मिता सेन हीने प्रमुख भूमिका साकरलेली.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी