PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी तेलंगणा, ओडिशा आणि जम्मू -काश्मीरमधील विविध रेल्वे प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यामध्‍ये जम्मू रेल्वे विभाग आणि तेलंगणातील एका टर्मिनल स्टेशनचा समावेश आहे. तसेच पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली.


यावेळी पंतप्रधान म्हणाले की, नवीन वर्षात भारत जोडणीचा वेगवान कायम राखला आहे. मला दिल्ली एनसीआरमध्ये 'नमो भारत' ट्रेनचा अद्भुत अनुभव आला आणि दिल्ली मेट्रोच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. आता आपल्या देशात मेट्रोचे जाळे १००० किलोमीटरहून अधिक आहे. गेल्या दशकात भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक कायापालट झाल्याचे आपण पाहिले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. यामुळे देशाची प्रतिमा बदलली आणि देशवासीयांचे मनोबलही वाढले आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेची जोडणी आणि रोजगार निर्मिती आणि उद्योगांना पाठिंबा, या चार मापदंडांवर आम्‍ही भारतीय रेल्‍वेचा विस्‍तार करत असल्‍याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.







जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन पठाणकोट-जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला, भोगपूर सिरवाल-पठाणकोट, बटाला-पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर विभागांना जोडेल. त्याची लांबी ७४२.१ किलोमीटर असेल. यामुळे भारताच्या इतर भागांतील रेल्‍वे संपर्कही सुधारेल. जम्मू विभागाच्या उद्घाटनामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रदेशाचा एकूण सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. तेलंगणामधील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनच्या ४१३ कोटी रुपये खर्च आला आहे.



मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे नवीन टर्मिनल स्टेशन पर्यावरणपूरक असेल, प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा असतील. यामुळे सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचेगुडा यांसारख्या शहरांमधील सध्याच्या कोचिंग टर्मिनल्सवरील गर्दी कमी होण्‍यास मदत होणार आहे. पंतप्रधान मोदींनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करणार आहेत. यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागात कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रादेशिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


Comments
Add Comment

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल