पालघर : पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात (२०१८)पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू झालेत. पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. डहाणू आणि दापचरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्यानं सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे.
https://prahaar.in/2025/01/06/malvani-festival-in-thane-from-friday/
पालघर जिल्ह्यात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. याधी पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसराला ३१ डिसेंबर २०२४ दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्का बसल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाले.याआधीही ऑगस्ट २०२४ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये डहाणू तालुक्यात भुकंपाचे धक्के बसले होते.
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…