
डहाणूत भूकंपाचे तीन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पालघर : पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात (२०१८)पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू झालेत. पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. डहाणू आणि दापचरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्यानं सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे.

ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे १० ...