बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, ४५९० पानी आरोपपत्र दाखल, २१० साक्षीदार

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सदस्य असलेल्या बाबा सिद्दीकींची ऑक्टोबर २०२४ मध्ये हत्या झाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act - MCOCA) न्यायालयात २६ अटकेतील आणि तीन फरार असलेल्या आरोपींच्या विरोधात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तपासाआधारे पोलिसांनी २१० साक्षीदारांच्या साक्षींची नोंद आरोपपत्रात केली आहे. पोलीस अद्याप झीशान अख्तर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई या तीन आरोपींना शोधत आहेत.



बिश्नोई टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली असा आरोप मुंबई पोलिसांनी आरोपपत्राद्वारे केला आहे. सलमानचे हितचिंतक असल्यामुळे बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न बिश्नोई टोळीने केला. प्रत्यक्षात फरार असलेल्या झीशान अख्तर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई या तीन आरोपींनी बिश्नोई टोळीला मुंबईत पाय पसरणे सोपे व्हावे यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.



आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा थेट उल्लेख नाही. आरोपी, फरार आरोपी अशा कोणत्याही स्वरुपात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा आरोपपत्रात उल्लेख दिसत नाही. यामुळे लॉरेन्स बिश्नोईचा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी अप्रत्यक्षरित्या संबंध असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे तीन कारणं असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. सलमानशी असलेली जवळीक, अनुज थापनच्या आत्महत्येचा बदला आणि बिश्नोई टोळीचा प्रभाव निर्माण करणे या तीन कारणांसाठी बाबा सिद्दीकींच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे