छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, ९ हुतात्मा

रायपूर : छत्तीसगडमधील बीजापूरमधल्या कुटरू भागात अंबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात जिल्हा राखीव रक्षकांपैकी (District Reserve Guard - DRG) आठ जवान आणि जवानांच्या वाहनाचा चालक असे नऊ जण हुतात्मा झाले. अनेकजण जखमी झाले. हा हल्ला सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता झाला. नक्षलवाद्यांनी आयईडीचा (Improvised Explosive Device - IED) वापर करून सुरक्षा पथकाच्या वाहनाला लक्ष्य केले. हल्ल्याच्या वृत्ताला बस्तर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी दुजोरा दिला आहे.



याआधी शनिवारी अबुझमाड येथील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा पथक यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत एक जिल्हा राखीव रक्षक आणि प्रधान आरक्षक सन्नू कारम हे हुतात्मा झाले. सुरक्षा पथकाने या चकमकीत चार नक्षलवाद्यांना ठार केले. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक महिला नक्षलवादी होती.
Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी