Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जानेवारी २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, ५ ते ११ जानेवारी २०२५

उत्साहात व आनंदात भर पडेल

मेष : अनुकूल शुभ ग्रहांच्या योगामुळे हा कालावधी अनुकूल जाईल. आपल्या अवतीभवती सकारात्मक घटना घडल्यामुळे उत्साहात व आनंदात भर पडेल. कुटुंबात शुभवार्ता यांचा ओघ चालू राहील. एखादी महत्त्वाची सकारात्मक घटना घडल्यामुळे पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या विवाह निश्चित होण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस निर्माण होऊन त्या कार्यात सक्रिय योगदान द्याल. कलाकार, खेळाडूंना अनुकूल कालावधी. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. पूर्वी दिलेल्या नोकरी विषयक मुलाखती सफल होतील.

कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल

वृषभ : आपल्या मनात बरेच दिवस घर करून राहिलेली एखादी महत्त्वाची आशा-आकांक्षा पूर्ण होईल. उत्साहाने व आत्मविश्वासाने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. काही महत्त्वाचे निर्णय हातावेगळे करता येतील. व्यवसायधंद्यात आर्थिक उलाढाल वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे समाधान लाभेल. आपल्या तसेच कुटुंबीयांच्या हौसेखातर खर्च करू शकाल. मित्रमंडळींच्या सर्व मौजमजेत सहलीचा आनंद लुटू शकाल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या स्वतःच्या वागण्या बोलण्याचा विरोधक गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.

अपेक्षित फलप्राप्ती होईल

मिथुन : अनुकूल ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर आपले केलेले नियोजन सफल होऊन अपेक्षित फलप्राप्ती होईल. घेतलेले निर्णय बरोबर ठरणार आहेत. महत्त्वाच्या कार्यात यशप्राप्ती झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल मात्र मिळालेल्या या यशाने हुरळून जाऊ नका. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय-धंद्यात स्पर्धेत यांवर विजय मिळविण्याच्या नादात चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नका. नुकसानीची तसेच फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. प्रवासाचे योग आहेत. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रणाची आवश्यकता आहे. इतरांशी स्पर्धा अंगलट येऊ शकते.

प्रशंसेस पात्र ठराल

कर्क : कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचा भाग्योदय होऊन उत्कर्ष तसेच प्रगती होईल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी लाभेल. तसेच नोकरी विषयक मुलाखती यशस्वी होतील. पूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून नोकरी बाबत बोलावणे येऊ शकते. चालू नोकरीत आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठरेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तसेच सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती ठीक आग्राहून व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. एखादे महत्त्वाचे प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. त्यामुळे रोजच्या नियोजनात बदल करावा लागण्याची शक्यता.

अधिकारात वाढ होईल

सिंह : कुटुंब परिवारात उत्साह व आनंद वाढविणाऱ्या वार्ता मिळतील. महत्त्वाची कार्य हातावेगळी करता येईल; परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक राहतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश संपादित करू शकाल. वरिष्ठ आपल्या मतास प्राधान्य देतील. पदोन्नती वेतन वृद्धी सारख्या घटना घटित होतील. अधिकार क्षेत्रात वृद्धी होऊन अधिकारात ही वाढ होईल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या अधिकारांची मर्यादा लक्षात घेऊन आपले कार्य पूर्ण करणे हिताचे ठरेल.

प्रश्न सुटतील

कन्या : समाजातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद लागतील. त्यांच्या ओळखीने अथवा मध्यस्थीने प्रश्न सुटतील. त्यांची मदत मिळू शकते; परंतु आपण आपले मत अथवा म्हणणे स्पष्टपणे त्यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने आपले मत मांडा. आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना गुरुजनांची तसेच कुटुंबातून मार्गदर्शनासह मदत मिळेल. कुटुंबात सकारात्मक राहिल्याने कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

फायद्याचे सौदे हाती येतील

तूळ : या कालावधीतील ग्रहमान आपल्याला उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देईल मात्र त्याचे सोने करणे हे आपल्याच हाती आहे. हे लक्षात ठेवणे हिताचे ठरेल. उपलब्ध झालेल्या संधी आणि त्या फलद्रूप करण्यासाठीचे प्रयत्न यांचा योग्य समन्वय साधल्याने प्रगतीचा आणि उन्नतीचा वेग वाढेल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. नवीन करार मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. परदेशी व्यापार व्यवसाय संबंधित नाती प्रस्थापित होऊ शकतात. परदेशवारीची शक्यता लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगणे हिताचं ठरेल.

विशेष प्रयत्नांची आवश्यकता

वृश्चिक : आपल्या कुटुंबीयांसमवेत तसेच मित्रमंडळींच्या बरोबर अथवा नोकरी व्यवसाय धंदा यांच्या निमित्त्याने जवळचे तसेच दूरचे प्रवास घडून शकतात. प्रवास कार्यसिद्धी राहतील. मात्र व्यवसायात, खाण्यापिण्यावर, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे. व्यवसाय-धंद्यात कामगारांविषयी समस्या उत्पन्न होऊ शकतात. तसेच घेतलेल्या निर्णयांमध्ये फेरबदल करावे लागतील. व्यावसायिक दृष्टिकोनातून नवीन केलेले बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. नोकरीत वरिष्ठांबरोबर चांगले संबंध टिकवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता.

नेत्रदीपक यश मिळू शकते

धनू : नोकरी, धंदा, व्यवसाय अथवा घरगुती कारणांमुळे दूरचे प्रवास संभवतात. प्रवासात काळजी घेणे हितकारक ठरेल. महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू व वाहने सांभाळा. आयात-निर्यातीच्या क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळू शकते. व्यावसायिक तेजीमुळे व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल. या संकल्पना यश मिळवून देतील. स्पर्धकांवर विजय मिळवाल. नवीन करारमदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.

वाद संपुष्टात येतील

मकर : दीर्घकाळ प्रलंबित असलेली सरकारी स्वरूपाची कामे या कालावधीत पूर्ण होतील. जमीनजुमला स्थावर संपत्ती याविषयीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. भावंडांमधील असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद संपुष्टात येतील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फलद्रूप होईल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय, धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. व्यावसायिकांच्या उलाढाली वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. जुनी येणी वसूल होतील. स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवसाय करण्याचे स्वप्न साकार होईल.

मंगलकार्य ठरतील

कुंभ : अनुकूल प्रवाही ग्रहमान यामुळे आपल्या आजूबाजूस गतिमान घटना घडून अनुकूलतेमध्ये वृद्धी होईल. दीर्घ काळ आपण जे काम पूर्ण होण्याची वाट पाहत होता असे काम पूर्ण झाल्याने उत्साहात वाढ होईल. स्थावर मालमत्ते विषयीच्या समस्या सुटतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढते राहील. कुटुंबात सुवार्ता यांचा ओघ चालू राहील. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रगती उत्तर वार्ता कानी आल्यामुळे कुटुंब परिवारात आनंदाची लहर येईल. विवाहयोग्य तरुण-तरुणींना आपल्या मनातील जीवनसाथीची निवड करता येईल. मंगल कार्य ठरतील. कुटुंबात आनंदी, उत्साही वातावरण राहील मात्र धावपळीची शक्यता. आप्तेष्ट, नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

सरकारी कायदे-नियम अवश्य पाळा

मीन : कोणत्याही लहान-मोठ्या कामांविषयीचे निर्णय घेताना संयम बाळगणे हिताचे ठरेल. पूर्ण विचाराअंती शांतपणे तसेच वेळ पडल्यास इतरांच्या सल्ल्याने सुद्धा निर्णय घेऊ शकाल. ते फायदेशीर ठरतील. आपल्या वागण्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबातील सदस्यांकडून तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. काहीवेळेस विशिष्ट कायदेशीर प्रश्न, कोर्ट प्रकरणे त्रस्त करण्याची शक्यता आहे. व्यवसाय धंद्यात सरकारी कायदे नियम अवश्य पाळा. नोकरीतील परिस्थिती सर्वसामान्य राहील.

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

1 hour ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago