मुंबई: अनेकदा तुम्ही लोकांना हे म्हणताना ऐकले असेल की नशिबात जे लिहिले आहे ते कोणीच बदलू शकत नाही. हे खरंच आहे की नशिबात जे काही असते ते कोणीच बदलू शकत नाही. कोणी मृत्यूच्या दाढेतूनही सहीसलामत परत येतो तर काहीजण आपला मृत्यू काही केल्या रोखू शकत नाही. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. मात्र असे असले तरी तुम्ही कर्माबाबत ऐकलेच असेल. की कर्माचे फळ आपल्याला मिळते. चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.
आयुष्याच्या या प्रवासात कर्म आणि नशीब ठरवतात की तुमचे जीवन कसे असेल. कर्म आणि नशीब एकमेकांच्या पूरक आहे. कर्माला नेहमी प्राधान्य दिले जाते. कर्म केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही जीवनात यश मिळत नाही. जर तुम्हाला तुमचे नशीब चांगले करायचे असेल तर सुरूवात चांगल्या कर्मांनी झाली पाहिजे. जर तुम्ही एखाद्याची निस्वार्थ भावनेने मदत करत आहात, प्रत्येकाशी प्रेमाने बोलत आहात, कोणाच्या मजबुरीचा फायदा उचलत नाही आहात, सगळ्यांच्या वाईट काळात त्यांना साथ देत आहात तर तुम्ही चांगले कर्म करत आहात. हीच कर्म तुम्हाला तुमच्या वाईट काळात मदत करतात आणि देवही तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतो.
नशीबात लिहिलेले तुमच्या चांगल्या कर्माने बदलू शकते. त्यामुळे कधीही कोणाचेही मन दुखवू नका. लोक विचार करतात की जर आपण काही वाईट केले तर आपल्यासोबत आता चांगले होत आहे म्हणजेच कधीही वाईट होणार नाही. मात्र असे नाही. गेल्या जन्मातील चांगल्या कर्माची फळे तुम्हाला आज मिळत आहेत. मात्र जर तुम्ही आता वाईट केले तर कोणत्या ना कोणत्या जन्मात तुम्हाला त्याची शिक्षा मिळू शकते.
चांगल्या कर्मामुळे आपल्या जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते. कर्म ही पुजेप्रमाणे असतात आणि त्यांना नेहमी पवित्र ठेवले पाहिजे. कर्म केल्याने शांतीपूर्ण मन आणि आत्मा मिळतो. तसेच सुखी जीवन प्राप्त होते.